
लोण बु. शिवारातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील लोण बु. शिवारातील खांबावरून १६२० मीटरची अल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्याने कट करुन चोरुन नेली असून याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महावितरणचे सहा. अभियंता विजयकुमार गुर्जर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १५ जून रोजी सकाळी भरवस कक्षातील वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील खैरनार यांनी फोन करून विज तारांची चोरी झाल्याचे कळविल्याने त्याठिकाणी भेट दिली असता लोण बू. शिवारातील भिकण पाटील यांच्या शेतात गेले असता अज्ञात चोरट्याने ९ गाळ्यांची बत्तीस हजार किमतीची १६२० मीटर लांबीची अल्युमिनियमची विजेची तार इलेक्ट्रिक पोलवरून कट करून चोरुन नेली आहे. त्यावरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो कॉ भरत गायकवाड हे करीत आहेत.




