अमळनेर :- शहरातील मंगल कार्यालयात लग्नाला आलेली गोवर्धन येथील एक ३५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना २६ रोजी घडली असून याबाबत अमळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
जागृती कैलाश पाटील (वय ३५) ही महिला २६ रोजी सकाळी भाऊबंधकीचे लग्न असल्याने मराठा मंगल कार्यालयात आली होती. पती कैलास पाटील यांनी लग्नात घरी माझ्या सोबत येणार आहे का?असे विचारल्यावर तिने मी चुलत देराणी सोबत घरी येईल असे सांगितले होते. मात्र ती महिला घरी पोहचली तरी जागृती पाटील घरी न पोहचल्याने पती कैलाश पाटील यांनी शोधाशोध सुरू केली मात्र ती महिला मिळून आली नाही.बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता महिला रिक्षा स्टॉप जवळ उभी राहून बस लागली असता तिकडे जातांना दिसली.मात्र ती महिला घरी न आल्याने अमळनेर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.