
अमळनेर:- शहरातील आर के नगर भागातील १३ वर्षीय मुलगा हॉस्टेलला राहणे आवडत नसल्याने घर सोडून बेपत्ता झाला होता तो रात्री उशिरा नाशिक धुळे बसमध्ये मिळून आला आहे.
नवोदय विद्यालयात होस्टेलला राहणे आवडत नाही म्हणून शिक्षक दाम्पत्याचा १३ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना २६ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने आईला फोन करून कटिंग करून येतो असे सांगितले व घरातून निघून गेला. त्यानंतर त्याचा कोणताही तपास न लागल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मंगरूळ एमआयडीसी मधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा मुलगा सायकलवर धुळ्याकडे जाताना दिसून आल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली होती. मात्र रात्री उशिरा त्याने त्याच्या वडिलांना सहप्रवाश्याच्या फोन वरून सांगितले की, तो नाशिक धुळे बस मध्ये असून धुळे येथे येत आहे. त्यावरून रात्री उशिरा धुळे येथून त्यास ताब्यात घेण्यासाठी घरची मंडळी रवाना झाली असल्याची माहिती मिळाली होती.








