
जून संपला तरी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच…
अमळनेर:- तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असताना महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर, शहर तसेच तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी बळीराजाला मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जून महिना संपत आला तरी देखील अद्यापही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परंतु काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा काही प्रमाणात पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. पाऊस येत नसल्याने नागरीक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र दोन दिवस ढगाळ वातावरण होते. यात आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.








