अमळनेर:- तालुक्यातील तांदळी व मांडळ येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता मीराबाई राजाराम भील ही महिला दारूचा कॅन घेवून विक्रीसाठी बसलेली दिसून आली. तिच्याकडे १२५० रुपये किमतीची १८ लिटर गावठी दारू मिळून आली. यावेळी दारूबंदी कायदा कलम ७५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महेकॉ रेखा भरत ईशी ह्या करीत आहेत.
तसेच तांदळी येथे पोलिसांनी छापा टाकला असता ज्योती संतोष पवार ही महिला दारू विक्री करताना रंगेहाथ आढळून आली. तिच्याकडे २० लिटर दारू मिळून आली असून नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा पोलिसांनी घटनास्थळीच नाश केला. सदर महिलेविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.