क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गौरव..
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपिक सचिन बापुराव पाटील यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडा-रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
रविवार दि. २५ रोजी नाशिक येथे पालकमंत्री दादाजी भुसे आणि अर्जुन पुरस्कार विजेते सईद जलालुद्दीन रिझवी यांच्या शुभहस्ते हा क्रीडा-रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी हे होते.
खासदार हेमंत आप्पा गोडसे ( नाशिक) शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, उपसंचालिका सुनंदा पाटील (क्रीडा विभाग नाशिक) शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, डॉ.बलवंत सिंह (अध्यक्ष, ग्लोबल ह्युमन रिसर्च अँड वेलफर सोसा.) शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते तसेच मार्गदर्शक अशोक दुधारे यांनी केले होते. सचिन पाटील हे डायरेक्ट हॉलीबॉल संघटनेचे जळगाव जिल्हा सचिव तसेच महाराष्ट्राचे सहसचिव आणि महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनचे सहसचिव आहेत. या पुरस्काराचे मानकरी सचिन पाटील यांचे कौतुक आणि अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, आणि सर्व संचालक मंडळाने केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले आणि प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.