
अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
काल दि. २८ रोजी चिमणपुरी पिंपळे येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम अंतर्गत सभा घेण्यात आली त्यावेळी कृषी विभागाच्या योजना, फळबाग, महा डी बी टी, पीएम किसान केवायसी यासह विविध प्रकारची माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवसाच्या निमित्ताने बाजरी बियाणे मोफत शेतकऱ्यांना आधार कार्ड व उतारा घेऊन वाटप करण्यात आले. तृणधान्य या पिकावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पेरणी करावी पावसाळा 20 ते 25 दिवस उशिरामुळे शेतकऱ्यांनी तृणधान्य घ्यावे असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक पुनम पाटील, समुह सहाय्यक दिनेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले.







