
अमळनेर:- शहरातील रामवाडी भागातील दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे काल आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात येवून स्थानिक रहिवाशांनी विठोबा रखुमाईची भक्ती भावे पूजा व आरती केली. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे लहान बाळगोपालांनी केलेली विठोबा रखुमाईची वेशभूषा होती. यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरणाची जणू ह्या चिमुकल्यांनी आरास उभी केली होती. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी लेझिम वाजवून दिंडीला शोभा आणली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे नेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका योगिता फाळके, स्वाती चव्हाण, मनीषा सोनार,पल्लवी येवले, संगीता पाटील,मनीषा शिरसाठ, यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्रिसिपल वर्षा सोहिते व पवन पाटील यांनी केले. त्यांना संस्थेच्या सचिव अलका पवार यांचे मार्गदर्शन लाभले.





