
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील ३६ वर्षीय तरुणाला शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १६ रोजी घडली आहे.
मंगरूळ येथील संदीप रंगराव बागुल वय ३६ याचा १६ रोजी दुपारी १२ वाजता विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. सरकारी वकील किशोर बागुल यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.







