
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील यात्रेतून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली असून याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तांबेपुरा, विप्रो कॉलनी भागातील रहिवाशी शेख मुक्तार शेख निजाम हे दिनांक २४ रोजी दुपारी धार येथील यात्रेसाठी गेले होते. शेख मुक्तार यांनी त्यांची स्प्लेंडर कंपनीची (एम.एच. १९ सिटी ५७७५) दुचाकी एका ठिकाणी लावून यात्रेत गेले. मात्र यात्रेतून परत आल्यावर लावलेल्या जागी मोटारसायकल दिसून आली नसल्याने मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोटारसायकल चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे कॉ मुकेश साळुंखे करीत आहेत.







