अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथील प्राथमिक रुग्णालयाच्या आवारात असलेल्या झाडावर अतिदुर्मीळ रूखा जातीचा साप आढळून आला.
भारतात अतिदुर्मीळ असलेल्या रुखा जातीचा (ब्राँझ बॅक ट्री स्नेक) साप जानवे येथील रुग्णालयाच्या आवारातील झाडावर आढळून आला. सर्पमित्र भावेश साळुंखे आणि दीपक चौधरी यांनी त्यास पकडले व निसर्ग सानिध्यात सोडले. अतिशय सुंदर असा हा रुखा जातीचा हा साप, संपुर्णपणे बिन विषारी असून लांबी साधारण तीन ते साडे तीन फूट आहे.