अमळनेर:- भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे नूतन अध्यक्ष संजय गाते यांनी नुकतीच अमळनेर येथे भेट देऊन श्री मंगळग्रह मंदिरात दर्शन घेतले.
त्यांच्या सोबत प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी,विनोद दळवी,प्रदेश सचिव मनोज ब्राम्हणकर उपस्थित होते. सुरवातीला त्यांनी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव भारती सोनवणे यांच्या अमळनेर येथील निवासस्थानी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर मंगल ग्रह मंदिर येथे सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी भाजपाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे ,माजी जि प सदस्य ऍड.व्ही.आर. पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील,महेश पाटील, महेंद्र पाटील प्रल्हाद पाटील, दिपक पाटील, अभिषेक पाटील, शहर अध्यक्षा छाया भामरे उपस्थित होते.