
आरोग्य निरीक्षक व मुकादमसह तिघांवर पोलीसात गुन्हा…
अमळनेर:- नगरपरिषदेच्या महिला सफाई कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोग्य निरीक्षक व मुकादमसह तिघांवर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे आणि मुकादम ज्ञानेश्वर मंगल संदानशीव हे कामावर त्रास देत होते. २७ जून रोजी सकाळी ९ वाजता विनयभंग करून तिला लोटून दिल्याने खाली पडली. त्यांनतर तिघांनी त्रास सुरूच ठेवला आणि तिघांनी १३ जुलै रोजी महिलेस शिस्तभंगाची नोटीस दिली. याबाबत मुख्याधिकाऱ्याकडे तक्रार केली. उशिराने गावाहून आल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.







