
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडे येथील कवी शरद धनगर यांची सोनी टीव्ही मराठीवरील कोण होणार करोडपती या शोमध्ये निवड झाली आहे. त्यांचा हा कार्यक्रम सोमवारी ते शनिवारी रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
सोनी टीव्हीच्या “कोण होणार करोडपती” या मालिकेत निवड होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. त्यात शरद धनगर यांची निवड झाल्याने त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. अनाथ मुलांच्या आणि शेतीच्या विकासासाठी या हॉट सीटवर जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याचा मानस शरद धनगर यांनी व्यक्त केला आहे.




