मारेकऱ्यास मृत्युदंड देण्याची निवेदनाद्वारे मागणी…
अमळनेर:- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटनेचा मराठा महासंघाकडून निषेध करण्यात आला असून मारेकऱ्यास मृत्युदंड देण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
सदर अत्याचारी मारेकऱ्याला भर चौकात फासावर लटकवून त्या निरागस बालिकेला न्याय मिळवून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अमळनेर येथे नायब तहसिलदार नवनाथ लांडगे यांना हे निवेदन देण्यात आले. त्यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष उमेश पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष सुरेश आसाराम पाटील, सूर्यकांत साहेबराव पाटील, भूषण शाम पाटील, कैलास हिम्मतराव ठाकरे, प्रवीण चिंतामन सैंदाने उपस्थित होते.