
महेंद्र बोरसे व सचिन पाटील परतले स्वगृही, हिरापूर व शेळावे येथील अनेकांचा प्रवेश…
अमळनेर:- तालुक्याला अनिल पाटील यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळताच अनेकांनी भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इनकमिंग वाढली असून अनेकांनी मंत्र्यांच्या हस्ते प्रवेश घेणे सुरू केले आहे.
तालुक्यातील सात्री येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे व पाडळसरे येथील सरपंच सचिन पाटील भाजप मधून स्वगृही राष्ट्रवादीत परतले आहेत. त्यांच्यासह अमळनेर मतदार संघातील मात्र पारोळा तालुक्यातील हिरापूर व शेळावे येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हिरापुर येथून वाल्मीक जिजाराम पाटील(सरपंच, जिल्हा अध्यक्ष स्वभिनाय संघटना), मोतीलाल यशवंत पाटील(उपसरपंच), जितेंद्र प्रताप पाटील(ग्रांप सदस्य), भास्कर आत्माराम पाटील (माजी सरपंच),गोविंद ताराचंद पाटील(माजी चेअरमन), जगन सिताराम पाटील(माजी चेअरमन), कैलास पाटील (सदस्य), सुरेश पाटील (माजी सरपंच), सुरेश सैंदाणे,गंगाराम पाटील (माजी सरपंच), महेंद्र पाटील,विजय पाटील,गोपाळ खैरनार,नाना भील(ग्रा.प सदस्य),लालचंद भील,संजय पगारे यांनी तर शेळावे बु येथून किरण पाटील, (सरपंच),दिपक पाटील, (माजी सभापती), काशिनाथ पाटील(माजी ग्रा.प. सदस्य), नत्थू पाटील(माजी उपसरंच) तुळशीराम पाटील, राजेंद्र पाटील, विश्वनाथ पाटील, संदिप पाटील, भाऊसाहेब पाटील, गुलाब पाटील, महेश पाटील,प्रभाकर पाटील (माजी सरपंच), प्रविण पाटील(मा उपसरपंच) शिवाजी पाटील, कपिल पाटील, किरण बिरडे, राजेंद्र राणे, नितीन पाटील, संजय पाटील, शरद पाटील, हिरालाल भिल, चिंतामण भिल,अमर भिल, दिपक भिल,अविनाश भिल,गणेश भिल,सतीश पाटील, गुरु भिल्ल,मनोहर नाईक,किसन भिल, मुरलीधर बोराडे, संदिप पाटील,संदिप दिनकर, अक्षय पाटील आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.




