पाच ते सहा ठिकाणी छापे मारत केले गुन्हे दाखल…
अमळनेर:- शहरात सट्टा व मटका सारख्या अवैधं धद्यांना मोठा ऊत आला असताना त्याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच अमळनेर पोलिसांनी काल शहरात कारवाईचा धडाका सुरू करून अनेक ठिकाणी छापे मारत कारवाई केली.
शहरात सट्ट्याची दुकाने खुले आम थाटली गेली असताना या अवैध धंद्यांतील व्यक्तीच्या वादातून शहर अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्या वादातून भविष्यात मोठा हिंसाचार घडल्यास नवल वाटू नये असे भाकीत वृत्तपत्रांनी वर्तविल्याने पोलीस निरीक्षक शिंदे यांनी आलेल्या वृत्ताची दखल घेत पोलीस पथकास कारवाईच्या सूचना केल्या. या अनुषंगाने काल दुपारी सहा फौजदार संजय पाटील,पो को चंद्रकांत पाटील,दीपक माळी, रवी पाटील,शरद पाटील,राहुल पाटील आदींनी मच्छी मार्केट व बाजारपेठ परिसरात पाच ते सहा ठिकाणी छापे मारून सट्टा साहित्य जप्त करून काहींना ताब्यात घेतले व संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळात येणारे सण लक्ष्यात घेता पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.