सरदार खतामुळे पीक खराब झाल्याने घेतला निर्णय, खरीप हंगाम गेला वाया…
अमळनेर-तालुक्यातील खेडी वासरे येथील उमेश धनराज पाटील या शेतकऱ्याने सरदार नामक खतामुळे कापूस पीक खराब झाल्याने 8 बिघे कापसावरती रोटावेटर फिरवला आहे.
या शेतात शेतकऱ्याने सुपर दाणेदार सरदार हे खत कपासाला दिल्यानंतर संपूर्ण 8 बिघा कापूस खराब झाला होता, वाढही थांबुन,पान अंबाळी सारखी झाली होती.सदर खतच पिकाला हानिकारक आहे. हे खत दिलेल्या आणि खत न दिलेल्या पिकावरून लक्षात आले त्यामुळे शेतकऱ्याने संपुर्ण कापूस पिकावर रोटावेटर फिरविला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याचा खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे.
दरम्यान कृषी विभागाकडून तालुक्यात कापूस पिकांची पाहणी करण्यात आली. यात अमळनेर तालुक्यात जानवे, मंगरूळ, पिंपळे, शिरसाळे, जवखेडा, खेडी, वासरे, मारवड परिसरातील सरदार खत लावलेले शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले असून कृषी विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे ही मागणी शेतकरी राजा करीत आहे.