नाशिक जिल्हा निरीक्षक म्हणून देखील मिळाली जबाबदारी…
अमळनेर:- येथील माजी जिल्हा बँक संचालिका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ निष्ठावंत नेत्या तिलोत्तमा पाटील यांची रा.काँ.च्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या ३२ वर्षे सक्रिय राजकारणात असलेल्या आणि तालुका ते राज्य पातळीवर विविध पदांचा कामकाजाचा अनुभव असलेल्या तिलोत्तमा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सदर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापने पासून ते आजतागायत पक्षाशी एकनिष्ठ तसेच प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. पक्ष फुटीनंतर अमळनेरमधून राज्य पातळीवर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने शरद पवार यांच्या विचारांच्या लोकांची सांगड घळणे सोईचे होणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातून प्रथमच एका महिलेचा विचार पक्षाच्या मुख्य संघटनेतील महत्त्वाच्या पदाकरीता झाल्याने समाधान वाटले असे तिलोत्तमा पाटील यांनी म्हटले.