अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, येथे अर्थशास्त्र विभागांतर्गत आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 वार बुधवार रोजी आदिवासींचे अर्थकारण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी आदिवासींचे अर्थकारण या विषयावर आपले विचार मांडून मौलिक असे मार्गदर्शन केले. त्यात जल, जंगल आणि जमीन हा आदिवासींचा मूलभूत अधिकार आहे. मुळ निवासी म्हणून ओळख असलेल्या आदिवासींना जंगल संरक्षित झाल्यामुळे उदरनिर्वाहासाठी भटकंतीची वेळ आली. परंतु यातून मार्ग काढत स्वयंरोजगाराकडे आदिवासी वळला आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशा पालन, डिंक, मध, कंदमुळे, रुद्राक्ष माळा यातून त्यांनी रोजगार निर्माण केला आहे. शिक्षण,आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधांमुळे आदिवासी समाजात जनजागृती होत आहे. स्वयंरोजगार आणि नोकरीतील संधीमुळे आदिवासी महिलांचे सबलीकरण होत आहे. शासनाने पुढाकार घेऊन योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला देखील समान संधी मिळाली पाहिजे असा आशावाद त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयातील प्राचार्य मा. डॉ. वसंत देसले यांनीही आदिवासी बांधवांच्या प्राचीन, थोर संस्कृती विषयी मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व विकासात आदिवासी यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रूढी, परंपरा, चालीरीती याचा त्यांना अभिमान आहे. निसर्गप्रेमी म्हणून खरी ओळख आदिवासींची असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. विजयकुमार भाईदास पाटील,प्रा.व्हि. डी. पाटील, प्रा.डॉ.देवदत्त पाटील,प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. किशोर पाटील, जगदीश साळुंखे, सचिन पाटील, श्रीमती मंजुषा गरूड व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.