अमळनेर:- तालुक्यातील ढेकु खु. येथील ६५ वर्षीय महिलेने वैफल्यग्रस्त होऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल १२ रोजी घडली आहे.
तालुक्यातील ढेकु खु. येथील संध्याबाई गुरुदेव निकम (वय ६५) यांनी राहत्या घरात छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना दिनांक १२ रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. यावेळी ग्रामस्थांनी प्रेत उतरवत अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. मयत संध्याबाई ह्यांच्या पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या मुलीचे लग्न झाल्याने त्या एकट्याच राहत होत्या. व मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत असत. एकट्या राहत असल्याने त्या नेहमी विचारात व वैफल्यग्रस्त राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना हितेश चिंचोरे करीत आहेत.