मारवड ग्रा.पं. व ग्रामस्थांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड मार्गे शहादा व नंदुरबार जाणारी बस सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
अमळनेर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मारवड हे तालुक्यातील मोठे गाव असून पंचक्रोशीतील गावातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर येणे जाणे सुरू असते. तसेच परिसरातील ग्रामस्थांचे बरेचशे नातेवाईक शहादा नंदुरबार परिसरात असून मारवड मार्गे बस सुरू झाल्यास प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होवून आगाराचे उत्पन्न वाढण्यास ही मदत होईल. त्यामुळे शहादा व नंदुरबार बस मारवडमार्गे सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेवेळी उपसरपंच भिकन पाटील, उमाकांत साळुंखे, डॉ. विलास पाटील, प्रदीप चौधरी, मधुकर चव्हाण, सूरज जाधव, अरुण वाणी यांच्यासह सहायक वाहतूक अधीक्षक चं. चौधरी, क्लर्क तुषार साळुंखे आदी उपस्थित होते.