उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त…
अमळनेर:- पोलीस भरतीसाठी अनेकांनी बेकायदेशीर इडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रमाणपत्र काढल्याचे उघडकीस आले असून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
पोलीस पाटील भरतीत आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे काही गावांना इडब्ल्यूएस घटकांना संधी मिळणार आहे. शासन नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती आदी घटकांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देता येत नाही. त्यामुळे खुल्या गटातील उमेदवार वंचित राहण्याची शक्यता आहे.तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी लासुर येथील जितेंद्र रामदास गांगुर्डे यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे.