
अमळनेर:- येथील शिवभक्तांनी लोकवर्गणीतून ४५ फूट त्रिशूल (डमरूसह) शहराजवळील वर्णेश्वर मंदिरावर स्थापन केला आहे.
शहराबाहेरील वर्णेश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर असून बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या शेजारून ओढा वाहतो. तालुक्यातील अनेक भक्तांची या मंदिरावर श्रद्धा आहे. या ठिकाणी नियमित येणाऱ्या शिवभक्तांनी एकत्र येत लोकवर्गणीतून मोठा त्रिशूल बसवण्याचा निर्णय घेतला. डमरूसह ५४० किलो वजनाचा त्रिशूल अजंग गावाहून बनवण्यात आला. शहरातील विजय मारोती मंदिराजवळ त्रिशूलाची पूजा व महादेवाची आरती करून डी जे वाजवत भक्तांनी त्रिशूलाची मिरवणूक काढली. मंदिरापर्यंत आल्यानन्तर विधिवत पूजा करून त्रिशूल रोवण्यात आला. भला मोठा त्रिशूल पाहून भक्तांनी मोठी गर्दी केली होती.




