मांडळ येथे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई…
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या इसमावर व मांडळ येथे अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील वावडे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता जवखेडा रस्त्यावर युवराज शामराव भील याला गावठी दारू विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडे ५५ लिटर गावठी दारू आढळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला असून मारवड पोलीसात दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ भरत श्रीराम इशी हे करीत आहेत.
तसेच मांडळ येथे जिल्हा परिषद शाळेजवळ पान टपरी चालवून अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दिलीप तान्हु चव्हाण यांच्यावर तंबाखूजन्य प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करत तंबाखू, सिगारेट, बिडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.