
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंचक्रोशीत हरिनामाचा गजर…
अमळनेर:- तालुक्यातील टाकरखेडा येथे दि. २४ गुरुवार पासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली असून यावर्षी सप्ताहाचे ५० वे वर्ष म्हणजेच सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने गावात आणि पंचक्रोशीत हरिनामाच्या गजर सप्ताहभर राहणार आहे. या काळात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सामाजिक धार्मिक व देशभक्तीवर प्रबोधन करतील.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे हरी ओम मित्र मंडळ यांच्याकडून महाप्रसादाचा खर्च उचलण्यात येणार आहे. त्याकरता गावातील आणि परिसरातील भाविकांनी महाप्रसादाच्या आणि कीर्तनरुपी ज्ञान अमृताच्या लाभ घ्यावा असे आवाहन गावातील नागरिकांनी पंचक्रोशीतील भाविकांना केले आहे.गुरुवार दि२४ रोजी ह.भ.प. कोमल सिंग महाराज धुळे, शुक्रवार दि.२५ हभप पुजाताई महाराज पाडळसे, शनिवार दि.२६ हभप श्री. ज्ञानेश्वर महाराज जळके, रविवार दि.२७ हभप कु. तेजश्रीताई पाळधी, सोमवार दि.२८ हभप श्री. जगन्नाथ महाराज सर,आर्वी, मंगळवार दि.२९ हभप श्री. विश्वनाथ महाराज वाडे, बुधवार दि.३० हभप श्री.सुनील महाराज कर्की, मुक्ताईनगर, गुरुवार दि. हभप श्री. गोविंद महाराज केकत निंभोरा, यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ वाजता होणार आहे. सप्ताह दरम्यान सकाळी ५ ते ६ वाजता काकड आरती, सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल. या सुवर्ण महोत्सवात हभप नवनीत महाराज, हभप श्रीराम महाराज, हभप दत्त महाराज,हभप शिवाजी महाराज, हभप अशोक महाराज, हभप सुभाष महाराज, हभप शिवदास महाराज, हभप प्रभाकर महाराज, हभप पंडित महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज,हभप सुरेश महाराज दोंदे वाडेकर सेवा देतील. तसेच हभप रूपचंद महाराज दहिवद खुर्द आणि हभप कैलास महाराज टाकरखेडेकर याच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम पार पडणार आहे. पंचक्रोशीतील भजनी मंडळ दहिवद खुर्द, म्हसले, कंडारी, निमझरी, लोणे, भोणे, जुनोने, ढेकू, चांदणी कुर्हे, खेडी, नगाव, गडखांब, व दहिवद या गावांची भजनी मंडळ या काळात सहकार्य देतील. तरी भाविकांनी या अमृत महोत्सव कीर्तन सोहळ्याच्या लाभ घ्यावा असे आवाहन हरिओम मित्र मंडळ टाकरखेडा यांच्यातील सामाजिक कार्यकर्ते नगराज जगन्नाथ पाटील, वसंत दगडू कुंभार, सागर भगवान कुंभार, गोरख उत्तम कुंभार, अमोल संजय पाटील,प्रवीण देविदास पाटील, प्रवीण लोटन पाटील, रवींद्र भालेराव पाटील,नरेश रवींद्र कुंभार व नितीन साहेबराव पाटील आदी कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी महाप्रसादाच्या लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.







