अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या एकाला मारवड पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले असून गुन्हा दाखल केला आहे.
डांगरी येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता दशरथ शंकर वडर (वय ४२) हा दारू विक्री करताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याकडे १६०० रुपये किमतीची चाळीस लिटर गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा पोलिसांनी नाश करून मारवड पोलिसांत दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना सुनील तेली हे करीत आहेत.