डॉ अनिल शिंदे यांचे समर्थन करत घटनेच्या सखोल चौकशीची मागणी…
अमळनेर:- शहरातील नर्मदा फाउंडेशन येथे विशिष्ट हेतूने डॉ अनिल शिंदे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करत गैरकायदा जमाव जमवून हॉस्पिटल बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आली या घटनेचा निषेध करत डॉक्टरांच्या विविध संघटनांनी प्रांत कचेरीवर मोर्चा काढून घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.
डॉक्टरांना रुग्ण तपासणी कामापासून रोखण्यात येऊन वैद्यकीय क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून डॉ अनिल शिंदेंसाठी आयएमए, निमा, होमियोपॅथी, डेंटल असोसिएशन, लॅबोरेटरी असोसिएशन, इलेक्टरोपॅथी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, पॅरा मेडिकल वर्कर असोसिएशन आदी संघटना एकवटल्या. प्रांताधिकारी महादेव खेडकर याना निवेदन देण्यात आले. निवेदनावर डॉ प्रशांत शिंदे, डॉ संदीप जोशी, डॉ अविनाश पवार, डॉ निखिल बहुगुणे, डॉ शरद बाविस्कर, डॉ सुमित सूर्यवंशी, डॉ राहुल मुठे, डॉ दिनेश महाजन, डॉ मिलिंद नवसारीकर, डॉ दीपक धनगर, डॉ जितेंद्र पाटील, डॉ एजाज रंगरेज, डॉ हेमंत कदम, डॉ रईस बागवान, चेतन पाटील, तुषार परदेशी, डॉ संजय जैन, डॉ विजय पवार, डॉ राजन पाटील, डॉ पी सी चव्हाण, डॉ संजय मुसळे,डॉ नरेंद्र जाधव , डॉ महेश पाटील यांच्यासह ८० डॉक्टरांच्या सह्या आहेत.