तनय रितेश चौधरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद…
अमळनेर:- नुकत्याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या तनय रितेश चौधरी याने १५ ऑगस्ट रोजी स्केटिंग रिले मॅरेथॉन २०२३ स्पर्धेत भाग घेऊन ३ जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
आशिया पॅसिफिक रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्डस् आणि एक्सट्रीम रेकॉर्ड तनय रितेश चौधरी आपल्या नावावर केले. तनय हा एलआयसी कॉलनी तील रहिवासी रितेश गोविंद चौधरी आणि स्नेहल रितेश चौधरी यांचा मुलगा असून गोविंदा किसन चौधरी, आशालता चौधरी यांचा नातू आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रा आर डी चौधरी, शिक्षक सेनेचे अध्यक्ष आणि तालुका समनवक समितीचे अध्यक्ष मधुकर वनजी चौधरी, महिला आघाडी शिक्षक सेनेच्या सरचिटणीस मनीषा गोविंदा चौधरी आणि प्राचार्य आर टी चौधरी यांनी तनय यांचे अभिनंदन केले आहे. बदलापुरात ११० स्केटिंग खेळाडूंनी तब्बल ५ तास स्केटिंग करून आशिया बुक मध्ये नाव नोंदवले. तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त, इंडियन स्कूल ऑफ स्केटिंग या संघाने हा विश्व विक्रमाला गवसणी घातली. आयएसएस स्केटिंग ट्रॅक, शिरगाव, योगी श्री अरविंद गुरुकुल, बदलापूर येथील पूर्व प्रशिक्षक मनिषा गावकर, दिपक गावकर, अथर्व गावकर, विलास चव्हाण, सानिया गावकर, अर्चना घरत, अनिकेत चव्हाण, खुशी संत्रा, वैभव खांडेकर, सुमित चव्हाण, राज पटवेकर, सागर नाईक, आकाश चव्हाण, आदींनी तनय यास मार्गदर्शन केले. यापूर्वी इंडियन स्कूल ऑफ स्केटिंगच्या खेळाडूंनी मे महिन्यात गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले. १९८२ सालापासून या संघाने स्केटिंग, कराटे व गिर्यारोहण क्षेत्रात अनेक पदक मिळवले व ठाणे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Related Stories
December 22, 2024