अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे झालेल्या वादातून काल दिनांक २७ रोजी दोन्ही गटातर्फे एकमेकांविरुद्ध पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे.
पहिल्या गटातर्फे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २६ रोजी रात्री १० वाजता निंभोरा येथील २१ वर्षीय विवाहिता व तिचा पती हे घरी जात असताना दिनेश कोळी, भुरा कोळी, संदीप कोळी हे त्यांना पाहून हसू लागले. सदर विवाहितेने त्यांना का हसले असा जाब विचारला असता दिनेश व भूरा यांनी महिलेला ओढत लज्जा उत्पन्न होईल असेल कृत्य केले. तसेच विवाहितेच्या पतीला मारहाण केली. विवाहितेचे दिर व नणंद भांडण आवरण्यास आले असता एकनाथ कोळी, सुदाम कोळी, ज्ञानेश्वर कोळी, नगराज कोळी, रवींद्र कोळी यांनी सर्वांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. सदर विवाहितेच्या फिर्यादीवरुन मारवड पोलिसांत विनयभंगासह इतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी लताबाई कोळी, दिनेश कोळी व कैलास कोळी हे ओट्यावर बसले असताना तेथून जाणाऱ्या आश्र्विनी पारधी हिने शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता तिने तिच्या नातेवाईकांना बोलवून दिनेश व कैलास यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी व तिच्या मुलीसही अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने अश्विनी पारधी, खुशाल पारधी, संगीता पाटील, हरीश पारधी, राजेंद्र पारधी, छाया पारधी, बापू पारधी, प्रकाश पारधी, सागर पारधी, प्रकाश पारधी, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही गुन्ह्यांच्या पुढील तपास हे कॉ संजय पाटील करीत आहेत.