अमळनेर:- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत आहे. त्यानिमित्ताने मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर तर्फे-विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
रविवार,दि.20 ऑगस्ट रोजी तिन्ही स्पर्धांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या स्पर्धांमध्ये अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांचे व क्लासेस संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले. श्यामकांत भदाणे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर मराठी वाङ्मय मंडळाचे सोमनाथ ब्रम्हे सर, शरद सोनवणे, प्रदीप साळवी, बन्सीलाल भागवत, सुरेश माहेश्वरी सर,अजय केले, श्याम पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धा परीक्षक म्हणून भाऊसाहेब देशमुख, ॲड.सारांश सोनार यांनी काम पाहिले तसेच निबंध स्पर्धा परीक्षण सौ.स्मिता शाह मॅडम यांनी तसेच काव्य लेखन परीक्षण विजयकुमार मोरे सर यांनी केले. वक्तृत्व स्पर्धा विजेते विद्यार्थी मृणाल पवार प्रथम, श्रावणी काळकर-द्वितीय, सोनल पाटील-तृतीय, आकांक्षा पाटील-उत्तेजनार्थ, अक्षता कोळी उत्तेजनार्थ, गार्गी जोशी उत्तेजनार्थ, निबंध स्पर्धा-विजयी स्पर्धक लहान गट- गौरव चौधरी-प्रथम पल्लवी पाटील द्वितीय, तनुष्का बडगुजर- तृतीय, मोठा गट- सारंग देवरे-प्रथम प्रांजल कुसुंबे-द्वितीय, गितेश पाटील-तृतीय, काव्य लेखन स्पर्धा विजयी स्पर्धक- प्रांजल कुसुंबे-प्रथम, अदिती साळुंके- द्वितीय, उर्वशी पाटील-तृतीय. स्पर्धा बक्षिसे महेश बढे सर, विनोद जाधव, आरिफ पिंजारी सर,परेश गुरव सर, स्वर्णदिप राजपूत सर, सूरश्री वैद्य मॅडम, सोनल जोशी मॅडम,सुनिल पाटील सर,अश्विनी खैरनार मॅडम, किरण माळी सर, ज्ञानेश्वर मराठे, धिरज पवार सर यांच्यामार्फत देण्यात आले. सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर सर यांनी केले. प्रास्ताविक संदिप घोरपडे यांनी तसेच अतिथी परीक्षक परिचय वसुंधरा लांडगे यांनी केला. आभार प्रदर्शनस्नेहा एकतारे यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी-मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, रमेश पवार, नरेंद्र निकुंभ, शीला पाटील मॅडम, पी.बी भराटे सर, हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.