विषबाधेने काळवीटाचा मृत्यू झाल्याची माहिती…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव शिवारात एका शेतात काळवीट मृत अवस्थेत आढळून आले असून विषबाधेने काळवीटाचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
अमळगाव-दोधवद शिवारात असलेल्या शेतात सदर शेतकरी सकाळी दैनंदिन कामकाजानिमित्त गेल्यावर मृत काळवीट नजरेस पडल्याने त्यांनी लागलीच सदर घटना वनविभागाला कळवली. वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे यांनी घटनास्थळी भेट देवून मृत काळवीट ताब्यात घेतले. अमळगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी सूरज बोरखडे यांनी पोस्टमार्टम केले व जानवे शिवारातील जंगलात आरएफओ शामकांत देसले यांच्या उपस्थितीत काळवीटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दूषित पाणी पिल्यामुळे विषबाधा झाल्याने सदर काळवीटाचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.