अमळनेर:- संत नरहरी महाराज जयंती निमित्त शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमळनेर सुवर्णकार समाजाचे विद्यमान प्र.अध्यक्ष गोपालशेठ दाभाडे यांचे हस्ते पादुका पूजन करण्यात आले. मिरवणुकीची वाडीचौक, संत नरहरी मार्गावरून बाजार सराफ बाजारातील संत शिरोमणी नरहरी चौकात उत्साहात संपन्न झाली. मिरवणुकीत संत नरहरी महाराजांच्या वेशभूषेत बालगोपाल मंडळीही सामिल झाली होती. प्रसंगी समाजातील ज्येष्ठ मंडळी अमृतशेठ भामरे, मिलिंद भामरे, मदनशेठ अहिरराव, गजानन भामरे तसेच समाजाचे सचिव आनंद दुसाने, तसेच विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दुसाने, जितेंद्र भामरे, नीलेश देवपूरकर, मनिष विसपुते, सुनिलशेठ वडनेरे, प्रमोद वाघ, अमित यादव, भैय्यासाहेब भामरे, हेमंत थोरात, पिंटू विसपुते, लाड शाखिय सुवर्णकार बांधव, कुणाल सोनार, योगेश पांडव तसेच असंख्य कार्यकर्ते व सुवर्णकार महिला मंडळ उपस्थित होते.