
अमळनेर:- तालुक्यातील बोदर्डे येथील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पती पत्नीविरुद्ध मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदर्डे येथील गुंताबाई भुरा महाले या महिलेला ग्रामपंचातीजवळ बोलवून मला का शिवीगाळ करते असे म्हणत काशिनाथ प्रकाश भील व दिपाली काशिनाथ भील यांनी काठीने मारहाण केली. व शिवीगाळ करत तू भिलाटीत कशी राहते तेच पाहतो अशी धमकी दिली. यात गुंताबाईच्या हाताला दुखापत झाली असून तिच्या फिर्यादीवरून काशिनाथ भील व दिपाली भील यांच्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महेकॉ रेखा भरत इशी करीत आहेत.




