
दहा दिवसांत पाण्याची टाकी योग्य तंत्रज्ञानाने पाडून नवीन टाकीचा प्रस्ताव…
अमळनेर:- शहरातील झामी चौकातील पाण्याची टाकी जीर्ण झाली असून कोणत्याही क्षणी ती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत पाण्याची टाकी योग्य तंत्रज्ञानाने पाडून नवा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
शहरात झामी चौक भागात नगरपालिकेची साडे सात लाख लिटर पाण्याची टाकी असून कुंभारटेक, माळीवाडा, भोईवाडा, साळीवाडा, बालाजीपुरा, झामी चौक, १२ नंबर शाळा आदी परिसरात या टाकीवरून पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याची टाकी वरून फुटली असून मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे हवेने घाण कचरा त्यात पडत होता. तसेच अनेक वर्षे जुनी झाल्याने टाकी जीर्ण झाली आहे. वरील पडदीचा काही भाग पडला आहे. ज्या खांबांवर टाकी उभी आहे ते देखील मोडके झाले आहेत. टाकीच्या आजूबाजूला पोलीस चौकी व घरे असल्याने जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात नागरिकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे तक्रार केली.




