अमळनेर:- तालुक्यातील सोनखेडी येथील पोलीस पाटील भरती प्रक्रिया १४ सप्टेंबर पर्यंत करू नये असे आदेश मॅट कोर्टाचे न्या पी आर बोरा यांनी दिले असून संबंधितांना नोटिसा काढून त्यांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तालुक्यातील सोनखेडी येथील दिनेश छगन मैलागीर हे ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्यांना पोलीस पाटील भरतीत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी अपात्र ठरवले होते. याविरोधात त्यांनी ऍड भरत वर्मा यांच्यामार्फत मॅट कोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत युक्तिवाद केल्यानंतर न्या बोरा यांनी १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवून तोपर्यंत सोनखेडी येथील भरती प्रक्रिया राबवू नये असे आदेश दिले आहेत.