
चेअरमनपदी नितीन पवार तर व्हा चेअरमन पदी संगीता पाटील यांची वर्णी…
अमळनेर:- तालुक्यातील पिळोदे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चेअरमन व व्हा. चेअरमन निवडणूक बिनविरोध पार पडली.
चेअरमनपदी नितीन दिनकर पवार व व्हाईस चेअरमनपदी संगीता अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सोसायटी सदस्य डॉ अनिल शिंदे, विकास पवार, राजेंद्र शिंदे, विलास कुलकर्णी, शांताराम पारधी, सुभाष पाटील सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस पी महाजन आणि सचिव रमेश महाजन यांनी काम पाहिले.




