अमळनेर:- राणी लक्ष्मीबाई चौकात हुतात्मा स्मारक स्थळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने शहरवासीयांनी हजेरी लावली.
२७ ऑगस्ट,१९४६ रोजी कामगारांवर झालेल्या गोळीबारात नऊ कामगार शहीद झाले होते. यात कॉम्रेड श्रीपत श्रावण पाटील, कॉम्रेड गंगाधर भिला बोरसे,कॉम्रेड बन्सीलाल जीवन कोळी, कॉम्रेड रतन हरी पाटील, कॉम्रेड मोकल झुमकीराम भावसार, कॉम्रेड शंकर मोतीराम बारी,कॉम्रेड शंकर धोंडीबा चव्हाण, कॉम्रेड सोनू रंगा चांभार, कॉम्रेड श्रीपत भिला हे नऊ कामगार हुतात्मा झाले होते. या महान बलिदानाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी डॉ अविनाश जोशी,प्रदीप अग्रवाल,नीरज अग्रवाल,भाऊसाहेब देशमुख, प्रा अमृत अग्रवाल,महेश माळी, शहीद मोकल भावसार यांचे नातू निलेश भावसार,गोपाळ बडगुजर,प्रा मनीष करंजे आणि महेंद्र रामोशे यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली.