अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथील जिल्हा परिषद उच्च शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
योगेश रघुनाथ साबळे व उज्वल दीपक शिरसाठ असे या विद्यार्थ्यांचे नाव असून दोन्ही विद्यार्थ्यांची ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड होवून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गोकुळ साळुंखे, शिक्षक जितेंद्र शेटे, सतीश पाटील, प्रेमराज पवार, चंद्रकांत देसले, यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, माजी पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, प. स. सदस्य प्रवीण पाटील, कलाली सरपंच मीनाताई सूर्यवंशी, शेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.