रा. काँ. शरद पवार गटाने दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…
अमळनेर:- येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने प्रांताधिकारी खेडकर यांना निवेदन देत तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, या वर्षी पाऊस उशिरा आल्याने खरीप हंगामाला, पेरणीला उशिरा सुरुवात झाली. तसेच मागील सुमारे 25 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे येणारे खरीप हंगामाचे उत्पन्नात साशंकता असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून तालुक्यातील शेतकरी हे हवालदील झालेले आहेत. तसेच आजपासूनच तालुक्यातील आज गावांचा पिण्याचे पाण्याचे संकट देखील आहे. तसेच पुढील दिवसात गुरांना चाऱ्यासाठी उपाय योजना करावी व पीक विमा 40% ची रक्कम लगेच जाहीर करून अदा करावी व विद्यार्थ्यांची शैक्षणिक शिक्षणाची फी माफ करावी तसेच खाजगी कोचिंगच्या संचालकांना ५०% फी घेण्याचे आदेश द्यावेत. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली असून अन्यथा सदर मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रदेश सरचिटणीस तिल्लोतमा पाटील, प्रदेश समन्वयक रिटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष शाम पाटील, सचिन वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.