अमळनेर:- तालुक्यातील धानोरा येथे अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील धानोरा येथे अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि शितलकुमार नाईक यांच्या सूचनेवरून पोना सुनील तेली, मुकेश साळुंखे, पोकॉ गुलाब महाजन यांच्या पथकाने धानोरा येथे भेट दिली असता जिप शाळेच्या पुढे दशरथ शिरसाठ यांच्या मालकीचे स्वामी किराणा सेंटरवर गुटखा व बिडी मिळून आली. तसेच जवळच असलेल्या भिमराव पवार यांच्या मालकीचे साई किराणा दुकानातून तंबाखू व बिडी असे तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. त्यावरून दोघांविरुद्ध मारवड पोलीसात तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पो ना सुनील तेली हे करीत आहेत.