मांडळ येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यात गेल्या महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिके कोमजून लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे गेले आहे. अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
तालुक्यातील मांडळ, मूूडी, वावडे परिसरातील शेतकऱ्यांची कोरडवाहूू पिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. ज्वारी, बाजरी, उडीद, मुग, कपाशी इत्यादी पिके शेतकऱ्याच्या हातातून गेेली असून पूर्णपणे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात शेतकऱ्यांनी लाखो रुपये टाकले असून पाणी नसल्याने पूर्णपणे खर्च वाया गेला आहे. शासन स्तरावरून तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी पाहणी दौरा करू दुष्काळग्रस्त स्थिती असल्याचा अहवाल शासन स्तरावर पाठवावा व शासनाने शेतकऱ्यांना पिक विम्याची चाळीस टक्के रक्कम जाहीर करून त्वरित अदा करण्यात यावी. यावर्षीची विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून शेतकऱ्यांचे या वर्षाचे पीक कर्जही माफ करण्याची मागणी केली आहे. तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने भविष्यात जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल म्हणून शासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मांडळ येथील निलेश भास्कर पाटील, विजय नत्थु पाटील, राजेंद्र अण्णा धनगर, संतोष पुंडलिक पाटील, रावसाहेब पंडित कोळी, सुरेश लोटन कोळी, भुरा काशिनाथ बडगुजर आदी शेतकऱ्यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी व कृषी अधिकारी यांना निवेदन देत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.