
एमपीएससीच्या माध्यमातून नियुक्ती, रुग्णांना मिळणार चांगल्या सुविधा…
अमळनेर:- अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकपदी अमळनेर येथील भुलतज्ञ डॉ. प्रांजली विनोद पाटील यांची एमपीएससीच्या माध्यमातून नियुक्ती झाली आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयाला शिस्त लावणे आणि चांगल्या आरोग्य सेवा रुग्णांना मिळतील.

भुलतज्ञ डॉ. प्रांजली विनोद पाटील यांची नियुक्ती एमपीएससीच्या जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग याद्वारे करण्यात आली असून 1 सप्टेंबर रोजी रुग्णालयात येवून त्यांनी आपला पदभार स्विकारला. डॉ. प्रांजली पाटील अमळनेर येथील बालरोगतज्ञ डॉ. विनोद पाटील यांच्या सौभाग्यवती असून या आधी धुळे येथील हिरे मेडीकल कॉलेजला त्या सेवारत होत्या. मुंबई येथून त्यांनी एमबीबीएस केले असून एम. डी. भूलशास्त्र ही पदवी तामीळनाडूतून त्यांनी प्राप्त केली आहे. विवाहानंतर त्या अमळनेरात सेवारत होत्या. अतिशय सुस्वभावी असलेल्या डॉ. प्रांजली पाटील यांची ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन स्वागत केले जात आहे. डॉ. सावकारे यांच्या नंतर अनेक वर्षांपासून सदर ह्या पोस्ट वर कुणीच नव्हते. आता प्रमुख पदावर भुलतज्ञ डॉ. प्रांजली विनोद पाटील यांची नियुक्ती झाल्याने रुग्णांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विशेष म्हणजे त्या अमळनेरच्या असल्याने रुग्णांची नाळ त्यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. डॉ. प्रांजली विनोद पाटील उच्च विद्याविभूषित (एमडी) आहेत. त्यांच्या आई मुंबईला नगरसेविका व शिक्षिका होत्या. त्यांचे पती सुद्धा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. अत्यंत महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने त्या निश्चित त्या पदाला न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




