समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन…
अमळनेर:- तालुका सकल मराठा समाजातर्फे जालना येथील मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील मराठा मंगल कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा निघणार असून शासनाच्या हुकूमशाही व जुलमी राजवटीचा निषेध केला जाणार आहे. समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.