आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत आयोजन…
अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था उमेद अभियानासमवेत राबवित असलेल्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात येत आहेत. त्यात ४ दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात 45 बचत गटातील गरजू महिलांनी केक बनवण्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी मान्यवर ऍडिशनल बीडीओ एस. व्ही. सोनवणे सर, यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे डॉ. अपर्णा मुठे स्त्री रोग तज्ञ, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या त्यांनी महिलांना आर्थिक आत्मनिर्भरतेवर मार्गदर्शन केले डॉ. भारती पाटील अध्यक्ष आधार संस्था, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महिलांसोबत चर्चा केली. त्याचप्रमाणे श्रीमती रेणू प्रसाद आधार संस्था कार्यकारी संचालक, सिमा रगडे उमेद तालुका समन्वयक, ज्योती भावसार उमेद तालुका समन्वयक, रविराज कांबळे प्रोजेक्ट मॅनेजर, किरण बनचवाड प्रोजेक्ट ऑफीसर हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच केक मेकिंग प्रशिक्षण देण्यासाठी सोनाली पाटील यांनी ४ दिवसीय प्रशिक्षण दिले. यापूर्वी प्रथम बॅच अंतर्गत पंधरा दिवसाचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण ग्रामीण महिलांना तसेच सेक्स वर्कर महिलांना देण्यात आले. आधार संस्थेच्या अश्विनी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राकेश महाजन, तौसिफ़ शेख, तेजस पाटकरी, प्रतिभा पाटील, दिप्ती शिरसाठ तसेच प्रोजेक्ट कॉर्डीनेटर मुरलीधर बिरारी यांनी विशेष सहकार्य केले.