
पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपदाची दिली जबाबदारी…
अमळनेर:- विधानसभेचे माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याहस्ते जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे अमळनेर मतदारसंघात शरद पवार गटाची ताकत वाढणार आहे.डॉ.बी.एस.पाटील हे १९९५ ते २००९ असे सलग १५ वर्ष भाजपचे आमदार होते.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार यांचा गट सत्तेत समाविष्ट झाल्याने अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील यांनी अजित पवार गटाची वाट धरली आणि मंत्री झाले. ना.अनिल पाटील यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी हा प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल पाटील हे मंत्री झाले तेव्हा बी. एस. पाटील यांनी शिष्य मंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त केला होता. आता मात्र शिक्षक दिनीच गुरू शिष्याला सोडून विरोधी गटात सामील झाले आहेत. महेंद्र बोरसे यांच्यानंतर बी एस पाटील यांनी पक्ष सोडल्याने मतदारसंघात भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे. डॉ.बी.एस. पाटील यांच्यावर पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी दिली असून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून हा प्रवेश झाल्याचे समजते. डॉ. बी.एस.पाटील अनेक खांदे समर्थक मतदारसंघात असल्याने येणाऱ्या काळात मतदारसंघातील समीकरण बदलणार आहेत.




