राज्यकर्त्यांनो याद राखा, गाठ दीड कोटी धनगरांशी आहे:- डी ए धनगर…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ व्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी साठी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. तसेच ढोल बजाव आंदोलनाने ढोल वाजवून न सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.
दहिवद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ व्या पुण्यतिथीनिमित्त गावातील धनगर बंधू भगिनींनी भंडारा उधळत अभिवादन केले. यावेळी अहमदनगर येथील चौंडी (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव) येथे धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी उपोषणास बसलेले यशवंत सेनेचे कार्यकर्ते यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसेच भंडारा आंदोलन यशस्वी केल्याबद्दल शेखर बंगाळे यांचेही अभिनंदन ठराव करण्यात आला. मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे परंतु काही झारीतील शुक्राचार्य शब्दच्छल करून धनगर समाजाला एसटी आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. घटनात्मक आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी धनगर समाज कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डी ए धनगर यांच्या नेतृत्वाखाली आत्मकलेश आंदोलन करण्यात आले. २०१४ मध्ये बारामती येथे झालेल्या आंदोलनात आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला होता की, जर धनगर समाज भाजपाच्या पाठीशी राहिला व आमचे सरकार आले. तर पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करू. परंतु प्रत्यक्ष तसे घडले नाही. त्याकरिता दहिवद येथील धनगर समाज बांधवांनी ढोल वाजवून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाला घटनादत्त असलेला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने धनगर बांधव भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन अशोक धनगर यांनी केले होते. कार्यक्रमाला गावाचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी जि प सदस्य ए टी पाटील, सी आर पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी पारधी, प्रविण माळी, अशोक धनगर,बाळासाहेब देसले, सरपंच देवानंद बहारे, ग्रामसेवक शेखर धनगर, सुनील पाटील, बाळू पाटील, भानुदास माळी, भगवान माळी व सर्व धनगर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.