
माजी आमदार स्मिता वाघ, भैरवी पलांडे व नगरसेविका नूतन पाटील यांची उपस्थिती
अमळनेर:- शहरातील सानेनगर भागात मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर पार पडले.नगरसेविका सौ. नूतन महेश पाटील, व सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांच्या वतीने शुक्रवार दि.14 जानेवारी रोजी मकरसंक्राती निमीत्त महा ई- श्रम कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात माजी आमदार स्मिता वाघ, व भैरवी पलांडे यांनी उपस्थितांना ई-श्रम कार्ड चे महत्व समजावून सांगितले. त्यात 18 वर्षांवरील तरूण, तरुणी शेतकरी बांधव, मजूर, व्यावसायिक, यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बहुसंख्य नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला.




