खतांचा वापर व फवारणीचे तंत्रज्ञान व फायदे या विषयांवर दिली माहिती…
अमळनेर:- तालुक्यातील राजमाता जिजाऊ महिला मंडळ अमळनेर यांनी स्थापन केलेल्या मातोश्री इंदूताई ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सभासदांसाठी शेतकरी सभा संपन्न झाली. इफको कंपनीच्या जळगांव जिल्ह्यातील विभाग – प्रमुख केशव शिंदे यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि नॅनो युरियाची पिकांवर फवारणीसाठी फवारणीचे तंत्रज्ञान व फायदे या विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमात कंपनी संचालक मंडळ, सभासद यांची उपस्थिती लाभली. येणाऱ्या पुढील काळात इफकोचे 10.26.26. खत उपलब्ध करून दयावे अशी संचालकांनी केशव शिंदे यांच्याकडे मागणी केली.