अमळनेर:- तालुक्यातील खेडी व्यवहरदळे येथे श्री चक्रधर स्वामी अवतार दिन व श्रीकृष्ण ज्ञान मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
खेडी व्यवहरदळे येथे दिनांक १६ रोजी रात्री महंत श्री पांगरीकर बाबा यांच्या सुत्रसिद्धांत लिला चिंतन संगीतमय प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. काल दिनांक १७ रोजी सकाळी ६ वाजता श्री मूर्तीस मंगलस्नान घालून ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. साडे नऊ वाजता दीपप्रज्वलन करण्यात आले. व दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी हजेरी लावत दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला. माजी आमदार बी एस पाटील, तिलोत्तमा पाटील, माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील, डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील यांच्यासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली. सायंकाळी भजनांचा व भारुडांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महानुभाव उपदेशी मंडळी व खेडी व्यवहरदळे ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभत कार्यक्रम उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.